पारा उतरला, थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला

 उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागली आहे. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. नाशिक जिल्ह्यात तपमान ६ अंशांपर्यंत खाली घसरले आहे.

Updated: Dec 17, 2014, 09:04 AM IST
पारा उतरला, थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला title=

मुंबई : उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागली आहे. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. नाशिक जिल्ह्यात तपमान ६ अंशांपर्यंत खाली घसरले आहे.

उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तपमान चांगलंच खाली आल्यानं नागरिकांना यंदा प्रथमच कडाक्याची थंडी अनुभवायला मिळतेय. मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेतायत.

राज्यात थंडीमुळे पारा गारठला असून, बहुतांश शहरातील तापमान 8 ते 9 डिग्रींनी खाली उतरलं आहे.

प्रमुख शहरांतील तापमान
पुणे - १०
मुंबई - १६
नाशिक - ६
नागपूर - १०
औरंगाबाद - ११

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.