मुंबईसह राज्यात हुडहुडी, नाशकात नीचांकी नोंद

गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या थंडीनं मुंबईत पुन्हा हजेरी लावलीये. तर नाशिक शहरात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली असून पारा ५.८  अंशापर्यंत गेलाय. दुसरीकडे पुण्यामध्ये ९.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

Updated: Jan 20, 2016, 09:39 PM IST
मुंबईसह राज्यात हुडहुडी, नाशकात नीचांकी नोंद title=
संग्रहित

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या थंडीनं मुंबईत पुन्हा हजेरी लावलीये. तर नाशिक शहरात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली असून पारा ५.८  अंशापर्यंत गेलाय. दुसरीकडे पुण्यामध्ये ९.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

मुंबई
मंगळवारी मुंबईत तापमानात कमालीची घसरण झालीय.  सांताक्रूझ वेधशाळेत 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. तर कुलाबा वेधशाळेत 18 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. पुढील दोन दिवस तापमान असंच राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. उत्तर महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. 

नाशिक 
शहरात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली असून पारा ५.८  अंशापर्यंत गेलाय. तर निफाड तालुक्यात ५.४ अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झालीय. मागील आठवड्यात तापमानात वाढ झाल्याने थंडी काहीशी गायब झाली होती. मात्र संक्रांतीपासून गारवारे वाहू लागल्याने पुन्हा एकदा थंडीच आगमन झालय. कालच्या ८.६ अंशावरून पारा   आणखी खाली घसरलाय. कमाल आणि किमान तपमानातील फरकामुळे रुग्णाच्या संख्येत वाढ होतेय. मात्र असं असतानाही या कडाक्याच्या थंडीतही नाशिककरांनी जॉगिंग ट्रॅकवर सकाळी गर्दी केली होती. उत्तरेकजून आलेल्या थंड वा-यांचा हा परिणाम आहे. पुढील दोन ते तीन दिवस हीच स्थिती कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.   

पुणे
आज सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये ९.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. मागील २ दिवसांपासून शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढलाय. उत्तर भारतातील वातावरणाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांत थंडीची तीव्रता वाढली आहे. अनेक शहराचं तापमान सरासरीच्या खाली उतरलं आहे. पुण्यामध्ये पुढील २ दिवस थंडी राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलय. त्यामुळे एरवी गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या पुणेकरांसाठी ही थंडी बोचरी थंडी ठरत आहे.