मुख्यमंत्र्यांच्या नवीन मागण्या... रेल्वेमंत्र्यांकडे पसरले हात!

राज्यातले अनेक रेल्वे प्रकल्प कागदावरच असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नव्या मागण्या केल्या आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 29, 2013, 12:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातले अनेक रेल्वे प्रकल्प कागदावरच असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नव्या मागण्या केल्या आहेत.
यामध्ये ठाणे- भिवंडी लोकल सेवा, कल्याण-वाशी लोकल सेवा अशा दोन प्रमुख मागण्या आहेत. रविवारी, रेल्वेमंत्री एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी या प्रमुख मागण्यांचे पत्र रेल्वेमंत्र्यांना देण्यात आलं. मुळात मुंबईशी संबंधित अनेक रेल्वे प्रकल्प कागदावरच आहेत. त्याचा पाठपुरावा करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय. असं असताना नव्या प्रकल्पाची मागणी का करण्यात आली? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.

पण, निवडणुका जवळ आल्यायत, त्यामुळे अशा लोकप्रिय मागण्या यापुढेही होणार, असं दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.