मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केलं हिंदीतून भाषण

मुंबई पालिका निवडणुकीसाठी आपले पाय भक्कम करण्यासाठी भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. म्हणूनच आता थेट रिक्षा आणि टैक्सी चालकांकड़े भाजपाने मोर्चा वळवला आहे. 

Updated: Oct 8, 2016, 12:05 AM IST
मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केलं हिंदीतून भाषण title=

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीसाठी आपले पाय भक्कम करण्यासाठी भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. म्हणूनच आता थेट रिक्षा आणि टैक्सी चालकांकड़े भाजपाने मोर्चा वळवला आहे. 

मुंबईच्या या भाषणावर राजकारण रंगण्याची चिन्ह दिसत आहे. 

मुंबई महानगर गैस या राज्य सरकारच्या कंपनी मार्फत मुंबईत टैक्सी -  रिक्शा चालकांच्या आरोग्य तपासणीचे अभियान भाजपाने मुख्यमंत्री आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्या उपस्थितीत सुरु केले. 

या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यात 20 हजार पेक्षा जास्त रिक्शा -  टैक्सी चालकांपर्यत भाजप पोहचणार आहे. तसंच केंद्र सरकारच्या उज्वला या कार्यक्रमाअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना LPG चे कनेक्शन देण्यात आले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात संपूर्ण भाषण मुख्यमंत्री यांनी हिंदीतुन केले. नुकतेच रिक्षा संघटनेवर मोठी पकड़ असलेले कामगार नेते शरद राव यांचे निधन झाले. तेव्हा या पोकळीचा फायदा घेत रिक्षा चालकांना भाजपा आपलेसे करण्यासाठी पावले टाकत आहे.