www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
सर्वसामान्यांसाठी ‘सिडको’नं खुशखबर दिलीय. सिडकोनं खारघर सेक्टर ३६ मध्ये उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या १,२४४ घरांसाठी नोंदणी आजपासून (१६ जानेवारी) सुरू केलीय.
खारघर सेक्टर ३६ इथल्या पारसिक डोंगराच्या पायथ्याशी आणि तळोजा तुरांगाच्या मागच्या बाजूला १,२४४ घरांचा गृहनिर्माण प्रकल्प मागच्या वर्षी हाती घेतला होता. यामध्ये उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी ४०२ घरे, तर मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी ८०२ घरे बांधण्यात आली आहेत.
तुम्हालाही या घरांसाठी नोंदणी करायची असल्यास सिडकोच्या नवी मुंबईतील दोन व मुंबईतील एका कार्यालयात अर्ज मिळणार आहे. याशिवाय ठाणे जनता सहकारी बँकेच्या शाखामधून मिळणार आहेत.
विशेष म्हणजे, खासगी बिल्डरांच्या स्पर्धेत या संकुलात तरणतलावापासून ते सीसी टीव्हीपर्यंत सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी १८ लाख रुपये खर्च करून या संकुलाजवळ तीन नमुना घरे तयार करण्यात आलेली आहेत. या घरांमध्ये सर्व घटकांना आरक्षण देताना सिडको कर्मचारी, पत्रकार, सैनिक यांना विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.