नवी मुंबई : नवी मुंबईतल्या एका खाजगी कंपनीत तब्बल 67 बालकामगारांची सुटका करण्यात आलीय.
नवी मुंबई आणि कामगार उपआयुक्तांनी तळोजामध्ये केलेल्या संयुक्त कारवाईत 60 अल्पवयीन मुली आणि 7 मुलांची सुटका करण्यात आलीय. तळोजाच्या ‘सी फूड प्रायवेट लिमिटेड कोल्ड स्टोरेज’वर हा छापा टाकण्यात आला होता.
इथून सुटका करण्यात आलेली सर्व अल्पवयीन मुलं आसाम आणि अन्य राज्यातली असल्याचं समोर येतंय. या मुलांचं शोषण केलं जात असल्याची तक्रार रेस्क्यू मिशन संस्थेनं केली होती, त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, असं रेस्क्यू मिशन संस्थेचे पदाधिकारी जेम्स वर्गीस यांनी माहिती दिलीय.
या सर्व मुलांना दिवसात 14 तासांपेक्षा जास्त राबवलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह आणखी एकाला अटक करण्यात आलीय. खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजरे यांनी ही कारवाई केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.