छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

छोटा राजनच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे, की जिच्याबद्दल अद्याप कुणाला फारशी माहिती नाही. ही विदेशी व्यक्ती एकतर त्याची पत्नी असावी किंवा लिव्ह-इन पार्टनर. पण 'ती' त्याची संकटमोचक नक्कीच आहे! पण मग यावेळी ती कोठे आहे? ती राजनच्या मदतीला का आली नाही?

Updated: Oct 29, 2015, 11:25 AM IST
छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण? title=

राकेश त्रिवेदी/ नित्यानंद शर्मा, मुंबई : छोटा राजनच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे, की जिच्याबद्दल अद्याप कुणाला फारशी माहिती नाही. ही विदेशी व्यक्ती एकतर त्याची पत्नी असावी किंवा लिव्ह-इन पार्टनर. पण 'ती' त्याची संकटमोचक नक्कीच आहे! पण मग यावेळी ती कोठे आहे? ती राजनच्या मदतीला का आली नाही?

सप्टेंबर २०००. बँकॉकमध्ये छोटा राजनवर दाऊद गँगनं हल्ला केला. त्यानंतर राजनच्या आयुष्यात झाला एका नव्या व्यक्तीचा प्रवेश. देखभाल करणाऱ्या नर्सच्या प्रेमात राजन पडला आणि तेव्हापासूनच तो तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतोय.

अधिक वाचा : जाणून घ्या कसा अटक झाला छोटा राजन

ती इंडोनेशियाची नागरिक आहे, तिचा पासपोर्टही इंडोनेशियाचाच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ती राजनची तिसरी पत्नी असली, तरी तसं अधिकृत जाहीर करण्यात आलेलं नाही.
 
राजनची ही तिसरी पत्नी त्याची जरा जास्तच खास आणि त्याची संकटमोचक असल्याची सूत्रांची माहिती आहे. पूर्वी एकदा राजनला पासपोर्ट प्रकरणी ताब्यात घेतलं गेलं होतं. तेव्हा या पत्नीनंच त्याची सुटका केली होती. यावेळीही ती राजनला सोडवू शकली असती. तसंच इंडोनेशियन नागरिक असल्यामुळे ती राजनच्या भारताकडे प्रत्यार्पणात खोडा घालू शकते.

अधिक वाचा : दाऊदला घाबरून राजनने केली स्वतःला अटक

मग प्रश्न असा उरतो, की यावेळी राजनची ही इंडोनेशियन पत्नी त्याच्या मदतीला का धावून आली नाही. राजनच्याच प्लॅनिंगनुसार त्याला सोडवण्याची खटपट टाळली जातेय का ? राजनला अटक झालेली नाही, तर त्यानं ती करवून घेतलीये, याच थिअरीला यामुळे बळकटी मिळतेय.

या इंडोनेशियन महिलेचीही चौकशी होणार का, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. एक नक्की. की राजनची ऑपरेशन्स आणि आर्थिक बाबींविषयी या तिसऱ्या पत्नीला थोडीफार माहिती नक्की असणार, अशी सूत्रांची माहिती आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.