छगन भुजबळ यांच्या २२ मालमत्तांवर टाच, ईडीची कारवाई

कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या २२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.

Updated: Aug 11, 2016, 11:40 PM IST
छगन भुजबळ यांच्या २२ मालमत्तांवर टाच, ईडीची कारवाई title=

मुंबई : कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या २२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.

या मालमत्तांची किंमत ९० कोटींच्या घरात असल्याचं समजतंय. साई कुंज बिल्डिंग, नाशिकचा एक भूखंड, भुजबळ वायनरीची शेतजमीन, नाशिकमधली द्राक्षबाग यांचा जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत भुजबळ परीवाराची एकूण ४३३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

गेले ४-५ महिने जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांची नाशिक आणि मुंबई येथील घरे काही दिवसांपूर्वीच जप्त केली होती. पण, मुंबईतील "ली पेटीट" या इडीने जप्त केलेल्या घरात राहू देण्यासाठी भुजबळ परीवाराची  कायदेशीर धडपड सुरु आहे.