मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या अडचणीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता गरज वाटल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
तपास पूर्ण करून 18 जूनपर्यंत कोर्टात अहवाल सादर करावा, असे आदेशही कोर्टानं एसीबी आणि ईडीसह इतर तपास यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा आता छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल करतात का?, याकडे सर्वांच लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.