शरद पवार यांनी दिले काँग्रेससोबत जाण्याचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिलेत. 

Updated: Apr 29, 2015, 08:10 PM IST
शरद पवार यांनी दिले काँग्रेससोबत जाण्याचे संकेत title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिलेत. 

देशात जनता परिवार ज्याप्रमाणे एकत्र आला तशा प्रकारचा एकत्र येण्याचा प्रस्ताव प्रागतिक पक्षाकडून आला तर आपण तो नाकारणार नाही, असं शरद पवारांनी आज स्पष्ट केलं. मात्र त्याचवेळी आपल्या पक्षाचे वेगळे अस्तित्व कायम राहिल अशीही पुस्ती त्यांनी जोडली. 

राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू असतानाच, पवारांनी ही नवी भूमिका मांडलीय. जनता परिवार जसा एकत्र आला, तसे एकत्र येण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून आला तर आपली भूमिका काय असेल असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला होता. तेव्हा शिवसेना-भाजपाला शह देण्यासाठी असा प्रस्ताव आला तर तो आपण नाकारणार नाही, असं उत्तर पवारांनी दिलं. 

दरम्यान, राहुल गांधीच्या महाराष्ट्रा दौऱ्याचं पवारांनी स्वागत केलं. दौऱ्यानं वस्तुस्थिती समोर येत असेल तर चांगले आहे असं ते म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.