मध्यावधी निवडणुकांविषयी चंद्रकांतदादा म्हणाले....

सरकार स्थिर असल्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 27, 2017, 03:25 PM IST
मध्यावधी निवडणुकांविषयी चंद्रकांतदादा म्हणाले.... title=

नवी दिल्ली : सरकार स्थिर असल्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुकीचीही नुसतीच चर्चा असून २०० संख्याबळ असताना काँग्रस राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप आणि शिवसेनेमधल्या कटुतेची तीव्रता कमी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील गुढीपाडव्याच्या नंतर मातोश्रीवर जाणार असल्याच्या बातम्या सुरु होत्या.

दरम्यान नारायण राणे हे सगळ्याच पक्षांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांच्या भाजपप्रवेशबद्दल प्रदेशाध्यक्ष स्थानिकपातळीवर चर्चा करून निर्णय घेतील असंही पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.