मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर बॉलिवूडच्या तीनही खानने हजेरी लावली. या आधी शाहरुख आणि सलमानने आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी चला गाव येऊ द्यामध्ये आले होते. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमिर खान याने ही हजेरी लावली. पाणी फाऊंडेशन सध्या महाराष्ट्रात पाणी वाचवण्यासाठी एक चळवळ उभी करते आहे आणि आमिर खान त्या चळवळीचा एक महत्वाचा भाग आहे.
आमिरने सपत्नीक या शो मध्ये आपली हजेरी लावली.
मिस्टर पेरफेकशनिस्ट आपल्या सिनेमाच प्रमोशन करण्यासाठी नाही तर पाणी फाऊंडेशन कशा प्रकारे काम करताय याची माहिती देण्यासाठी या शो मध्ये आला होता. या चळवळीत त्याची पत्नी किरण राव देखील त्याचा सोबत काम करते आहे. आमिर ने या चळवळीच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे.
या चळवळीत 10 हजारापेक्षा अधिक लोक आज जोडले गेले आहेत आणि 3 तालुक्यामध्ये सुरु झालेल काम आता 30 तालुक्यामध्ये पोहचला आहे आणि जवळपास 1 लाख लोकं या चळवळशी जोडले जातील अशी माहिती आमिरने या वेळेस दिली.
मराठी मी शिकतोय आणि आणि राज्यभाषा आपल्याला आली पाहिजे अस आमिर ने या वेळी नमूद केलं.
मी जेव्हा मराठी सिनेमा करेल तेव्हा पूर्णपणे मराठी शिकलेलो असेल अस देखील या वेळी आमिर ने सांगितलं. आमिरचा वाढदिवस देखील सेट वर साजरा करण्यात आला. आपल्या पत्नी सोबत त्याने या वेळेस डान्स हि केला.
पाणी फाऊंडेशन एका स्पर्धेच्या माध्यमातून गावगावांमध्ये ही चळवळ घेऊन जात आहे. हे काम कशा प्रकारे गावागावांमध्ये सुरु आहे याबाबत चा शो एकाच वेळी सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येणार आहे. या वेळी जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन देखील या मंचावरून करण्यात आलं.