मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ आणि कुटुंबिय आणखी अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. एकूण छगन भुजबळ यांना जामीन मिळणे आता कठीण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
छगन भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळ यांच्याविरोधात विशेष ईडी न्यायालयात २० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. मनी लाँड्रिंग कायद्याखाली ईडीने आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष इडी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलं. समीर भुजबळांविरोधात ईडी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ आणि पंकज भुजबऴ यांच्यावरही ठपका ठेवला असल्याने भुजबळ कुटुंबिय अडचणीत आले आहे.
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, पाटबंधारा खात्याशी संबंधित अनेक अधिकाऱ्यांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.