मध्य मार्ग आणि ठाणे- वाशी रेल्वेसेवा विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक दोनवेळा विस्कळीत झाली. सातत्याने मध्य मार्गावरील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही मध्य रेल्वे काही बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे. कळवा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड त्यानंतर अंबरनाथ येथे रेल्वे रूळाला तडे गेलेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, ठाणे - वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होती. ती पूर्वत सुरू झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 13, 2013, 12:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,ठाणे
मध्य रेल्वेची वाहतूक दोनवेळा विस्कळीत झाली. सातत्याने मध्य मार्गावरील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही मध्य रेल्वे काही बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे. कळवा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड त्यानंतर अंबरनाथ येथे रेल्वे रूळाला तडे गेलेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, ठाणे - वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होती. ती पूर्वत सुरू झाली आहे.
कळवा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील सर्व गाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. या आठवड्यात मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडाची ही तिसरी घटना आहे. तर अंबरनाथ येथे रूळाला तडे गेल्याने बदलापूर ते कल्याण दरम्यानची वाहतूक पुन्हा ठप्प झाली.
याआधी बदलापूर स्थानकाजवळ सीएसटीकडे येणा-या लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ बुधवारी तुटल्याने कर्जत ते कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यापूर्वी मंगळवारी दिवा स्थानकाजवळ लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणा-या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. अशा वारंवार घटना घडत असल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैराने दरम्यान, तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे - वाशी दरम्यानची अप आणि डाऊनची सेवा जवळपास पाऊन तास ठप्प होती. मात्र, ठाणे - पनवेल सेवा सुरू होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.