अभिनेत्री तब्बूच्या जीवनातील अडचणी आणि मात

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू आज ४४ वर्षाची झाली, तब्बूने १९८० पासून चित्रपटात कामाला सुरूवात केली. आपल्या शानदार करिअरमध्ये तब्बूने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. तब्बूला माचिस आणि चांदनी बारसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, तब्बू नुकतीच हैदर आणि दृश्यममध्येही झळकली.

Updated: Nov 4, 2015, 09:15 PM IST
अभिनेत्री तब्बूच्या जीवनातील अडचणी आणि मात title=

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू आज ४४ वर्षाची झाली, तब्बूने १९८० पासून चित्रपटात कामाला सुरूवात केली. आपल्या शानदार करिअरमध्ये तब्बूने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. तब्बूला माचिस आणि चांदनी बारसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, तब्बू नुकतीच हैदर आणि दृश्यममध्येही झळकली.

अभिनेत्री तब्बूचा आज वाढदिवस, आयुष्यात अभिनेत्री तब्बूच्या जीवनात अनेक अडचणी आल्या, तरीही तब्बू अभिनेत्री म्हणून नावारूपास आली त्याचा हा पट...
१) तब्बूने अभिनेता जॅकी श्राफवर छेडछाड, तसे बलात्कार करण्याचा आरोप केला होता, जेव्हा तब्बू लहान होती. मात्र जॅकी श्राफने हे आरोप फेटाळून लावले होते. हा प्रकार डॅनीच्या घरी घडल्याचं आरोपात तब्बूने म्हटलं होतं.
२) तब्बूचं लग्न झालेलं नाही, मात्र बॉलीवूडमध्ये तब्बूचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलंय, जसे साजिद नाडियादवाला, संजय कपूर, नागार्जुन.
३) तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम फातिमा हाश्मी आहे, मात्र लोक त्यांना तब्बू म्हणून ओळखतात.
४) तब्बूच्या आईवडिलांची फारकत झाली तेव्हा तब्बू खूप लहान होती, तब्बूने आपल्या वडिलांना पाहिलं नसल्याचंही सांगण्यात येतं.
५) तब्बूने आपल्या बॉलीवूड करिअरमध्ये आपल्या लूक्स सोबत अनेक प्रयोग केले आहेत. मात्र तब्बूने आपली हेअर स्टाईल कधी बदलली नाही, तब्बू आपले काळेभोर लांब केस आपली संपत्ती मानते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.