मुंबई : कुलभूषण जाधवांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भारतात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला.
मुंबईत फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. तर वाराणसीत जोरदार देशभक्तीचा घोषणा देण्यात आल्या. संपूर्ण देशात या निर्णयाचे पडसाद उमटले.
या निकालामुळं जणू विजयोत्सवरच साजरा करण्यात आला. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळताच मुंबईतल्या त्यांच्या लोअर परळ इथल्या जुन्या घराबाहेर, त्यांचे जुने शेजारी आणि मित्रमंडळींनीही एकच जल्लोष केला.
त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी.