www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चिंटू शेख गोळीबार प्रकरणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना दिलासा मिळालाय.
या प्रकरणी एका आठवडयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येईल, असं सीबीआयनं हायकोर्टात सांगितलंय. मात्र, त्याच वेळी सीबीआयचा दुरूपयोग केल्याबद्दल याचिकाकर्त्याला दंड ठोठावण्याची मागणीही सीबीआयनं केलीय.
२०११ साली उच्च न्यायालयानं सीबीआयकडे तपास सोपवला होता. तेव्हा एका आठवडयात क्लोजर रिपोर्ट देऊन केस बंद करावी, असा अहवाल मजिस्ट्रेट कोर्टात देण्यात आला होता. मात्र, त्याला चिंटू शेख यानं विरोध केला आणि अधिक तपास करण्याची मागणी केली. मग, आता का तडजोड केली जातेय? असा प्रश्न सीबीआयच्या वकील रिबेका गोन्साल्विस यांनी केला.
नितेश राणेंची बाजू अॅड. महेश जेठमलानी यांनी मांडली. कोर्टनं दोन्ही बाजु ऐकून घेतल्यानंतर चिंटू शेखला नोटिस बजावली आहे. पुढील सुनावणी १० जूनला होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.