आता ATM मधून पैसे काढणे होणार महाग

 आता आगामी काळात ATM मधून पैसे काढणे महागात पडणार आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने सरकारला ATMमधून पैसे काढण्यावर अर्धा टक्के शुल्क लावण्याची सूचना दिली आहे. कॅशलेस इकॉनॉमी वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

Updated: Jan 25, 2016, 09:06 PM IST
आता ATM मधून पैसे काढणे होणार महाग  title=

मुंबई :  आता आगामी काळात ATM मधून पैसे काढणे महागात पडणार आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने सरकारला ATMमधून पैसे काढण्यावर अर्धा टक्के शुल्क लावण्याची सूचना दिली आहे. कॅशलेस इकॉनॉमी वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

०.५ टक्के शुल्क लावण्याचा प्रस्ताव

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार कॅटने आपल्या प्री बजेट मेमोरन्डमममध्ये सरकारने कॅशलेस ट्रान्सक्शन वाढविण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यावर ०.५ शुल्क लावावे अशी सूचना केली आहे. तसेच बँकाना डेबिट आणि क्रेडिट कार्डावर लावण्यात येणाऱ्या सेसला वगळण्याचीही सूचना केली आहे. 

कार्डाने पेमेंट करणाऱ्याला कॅशबॅक 

कॅटने सूचना दिली की कार्डाने पेमेंट करणाऱ्यांना कॅशबॅकची सुविधा द्यावी तसेच विविध प्रकारे टॅक्स बेनिफिट द्यावेत. त्यामुळे ऑनलाइन ट्रान्सक्शन वाढतील. 

दरवर्षी एटीएममधून काढले जातात २० लाख कोटी रुपये 

कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि सेक्रेटरी प्रविण खंडेलवाल यांना सांगितले की, देशात १ लाख ९४ हजार एटीएम मशीन आहेत. त्यातून दरवर्षी २० लाख कोटी रुपये काढले जातात.

 

सरकारला ११ हजार कोटीचा फायदा 

अशा प्रकारे शुल्क लावण्यात आल्याने सरकारला सुमारे ११ हजार  कोटी रुपये महसूल मिळणार आहे. त्यामुळे महसूली तूट कमी होण्यात मदत होईल. 

डेबिट-क्रेडिट कार्डाचे शुल्क संपवावे 

क्रेडीट कार्डावर २ टक्के आणि डेबिट कार्डावर १ टक्के शुल्क आकारण्यात येते त्यामुळे लोक कार्डाने पेमेंट करत नाही. त्यामुळे बहुतांशी व्यवहार कॅश करतात. आता हे शुल्क रद्द झाले, कॅश व्यवहार कमी होतील.