मुंबई : मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय. त्यामुळं मध्य रेल्वेवर लोकलच्या 41 फे-या वाढणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार ट्रान्स हार्बर मार्गावर 22, हार्बर मार्गावर 7 आणि मुख्य मार्गावर 12 फे-या वाढवण्यात येणार आहेत.
नवीन वेळापत्रकामध्ये 16 फे-यांचा विस्तार करण्यात आलाय. हार्बर मार्गावरील गाड्या बेलापूरऐवजी पनवेल, वडाळा ऐवजी सीएसटी स्थानकापर्यंत तर ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल नेरुळ, बेलापूर ऐवजी पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावरील फे-यांची संख्या 583 वरून 590 होणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील फे-या 210 वरून 232 वर पोहोचणार आहे. लोकलच्या फे-यांमध्ये वाढ होणार असल्यानं गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.