www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्यव्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या याचिकेची कोर्टानं दखल घेत दिल्ली पोलिसांना २२ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सीएसटी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या सचिवांवर टिका करत बिहारींबाबत वक्तव्य केल्यानं वाद निर्माण झाला होता. आझाद मैदानातील भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारी नेत्यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला होता. मुंबईतले आरोपी युपी आणि बिहारमध्येच का जातात असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. बिहारमध्ये महाराष्ट्रातील गुन्हेगारांना आश्रय मिळतो, असा आरोपही राज ठाकरेंनी केला होता