मोबाईलवर बोलणं बंद करा, कॉलरेट वाढणार

रिलायन्स कम्युनिकेशन्सने कॉलिंग रेट्समध्ये 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ शुक्रवारपासून लागू केली जाणार आहे.

Updated: Sep 21, 2012, 08:33 PM IST

www.24taas.com, मुंबई
रिलायन्स कम्युनिकेशन्सने कॉलिंग रेट्समध्ये 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ शुक्रवारपासून लागू केली जाणार आहे. त्यामुळे `रिलायन्स`वरून बोलणे आता ग्राहकांना महागात पडणार आहे. रिलायन्सनुसार कॉल रेट 1.2 पैशांवरून 1.5 पैसे केले आहे.
देशातील दुसर्‍या क्रमाकांची मोबाइल कंपनी समजली जाणारी रिलायन्स कम्युनिकेशन्सची ग्राहक संख्या घटली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिल्या जाणार्‍या सेवा सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.
रिलायन्सच्या या निर्णयाचा परिणाम अन्य मोबाइल कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे. इतर मोबाइल कंपन्या देखील आपले कॉल रेट्स वाढविण्‍याची शक्यता नाकारता आहे. कॉल रेट्‍स वाढण्याची ही एका वर्षांत दुसरी घटना आहे.