नवी मुंबईतील बस प्रवास महागला

एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनएमएमटीनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वसाधारण बसेससाठी २ रुपये तर वातानुकूलित बसेससाठी ५ रुपयांची तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.

Updated: Jul 6, 2015, 04:17 PM IST
नवी मुंबईतील बस प्रवास महागला  title=

नवी मुंबई: एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनएमएमटीनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वसाधारण बसेससाठी २ रुपये तर वातानुकूलित बसेससाठी ५ रुपयांची तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामध्ये ३६० बसेस आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रासह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल आणि उरण या भागात ५१ तर वातानुकूलित ६ अशा ५७ मार्गावर ३६० बसेसपैकी २७५ बसेस धावतात. या बसेसच्या भाडेवाढीमुळं एनएमएमटीच्या उत्पन्नात १० टक्के म्हणजे ३ लाख रुपयांची दररोज भर पडणार आहे. 

परिवहन प्राधिकरणानं दोन वर्षांपूर्वीच भाडेवाढीला परवानगी दिली होती. मात्र लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं भाडेवाढ झाली नाही. निवडणूक संपताच भाडेवाढ लागू करण्यात आली. सर्वसाधारण बससेवेकरिता ५० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येकी २ किमी किंवा त्याच मार्गावरील जवळच्या अंतरासाठी १ रुपया भाडेवाढ केली आहे, तर वातानुकूलित बससेवेकरिता ५० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येकी ४ किमी त्यांच्या अंश भागात ५ रुपयेनुसार भाडेवाढ आकारण्यात आले आहेत. 

तसंच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या ओळखपत्राच्या आधारे विशेष ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.