मुंबई मनपाला बोनस, नवी मुंबईकरांना घरं जाहीर

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर.. दसऱ्याच्या मुहुर्तावर मुंबई महापालिका कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय. नवी मुंबईकरांसाठीही खूषखबर आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 24, 2012, 10:29 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर.. दसऱ्याच्या मुहुर्तावर मुंबई महापालिका कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 12 हजार 100 रुपये बोनस मिळणार आहे. यामुळं महापालिकेवर 130 कोटींचा बोजा पडणार आहे. दसऱ्यापूर्वीच दिवाळी बोनस जाहीर झाल्यानं मुंबई मनपा कर्मचारी सुखावले आहेत.
नवी मुंबईकरांसाठी खूषखबर आहे. सिडको नवी मुंबईत 12 हजार घरं बांधणार आहे. खारघरमधल्या गृहनिर्माण योजनेची लॉटरी लवकरच जाहीर करण्यात येईल. या गृहनिर्माण योजनेमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी ८०३ घरं, तर उच्च उत्पन्न गटासाठी ४२२ घरं असणार आहेत.
खारघर तळोजा जेलजवळ असलेल्या या गृहप्रकल्पाजवळूनच मेट्रो जाणार आहे. सहाहून अधिक 3 सिलिंडर सबसिडीने द्यावेत की नाहीत, याचा निर्णय दिवाळीपूर्वी घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.