चुकीच्या पद्धतीने अटक केल्याची भुजबळांची याचिका फेटाळली

छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयानं जबरदस्त दणका दिला आहे. आपल्याला ईडीनं केलेली अटक ही चुकीच्या पद्धतीने केलेली अटक आहे. असा दावा करणारी याचिका छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली.

Updated: Dec 14, 2016, 12:25 PM IST
चुकीच्या पद्धतीने अटक केल्याची भुजबळांची याचिका फेटाळली title=

मुंबई : छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयानं जबरदस्त दणका दिला आहे. आपल्याला ईडीनं केलेली अटक ही चुकीच्या पद्धतीने केलेली अटक आहे. असा दावा करणारी याचिका छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली.

मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं छगन भुजबळांची ही याचिका फेटाळली. त्यामुळे ईडी कस्टडीतून बाहेर पडण्याची छगन भुजबळांची धडपड दुस-यांदा अयशस्वी ठरली. याआधी तब्येतीच्या आधारावर छगन भुजबळ यांनी जामिन अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने विशेष डॉक्टरांचं पथक स्थापन केलं होतं.

भुजबळ हे ठणठणीत आहेत हे या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामिन अर्ज फेटाळला होता. आणि पुन्हा आपल्याला ईडीनं केलेली अटक ही चुकीच्या पद्धतीनं केलेली अटक आहे असा दावा करणारी याचिका छगन भुजबळांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.