निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेचे बिल्डर्सला 'खैरात'

 मुंबई महनगरपालिकेने आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत बिल्डरांवर एफएसआयची खैरात केली आहे. पूर्वी मुंबईत १ ते ३.५ पर्यंतच एफएसआय दिला जायचा आणि तो २ ते ५ पर्यंत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे तारांकित हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांसाठी पूर्वी ३ ते ३.५ एफएसआय दिला जायचा. आता यासाठी सरसकट पाच एफएसआय दिला जाणार आहे. 

Updated: Apr 27, 2016, 06:47 PM IST
निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेचे बिल्डर्सला 'खैरात'  title=

मुंबई :  मुंबई महनगरपालिकेने आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत बिल्डरांवर एफएसआयची खैरात केली आहे. पूर्वी मुंबईत १ ते ३.५ पर्यंतच एफएसआय दिला जायचा आणि तो २ ते ५ पर्यंत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे तारांकित हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांसाठी पूर्वी ३ ते ३.५ एफएसआय दिला जायचा. आता यासाठी सरसकट पाच एफएसआय दिला जाणार आहे. 

 
 एफएसआयची खैरात

 -  बांधकामासाठीही 5 एफएसआय दिला जाणार आहे. 
- पूर्वी शहरातील इमारतींसाठी १ तर उपनगरातील इमारतींसाठी १.३३ इतका एफएसआय दिला जायचा आणि यासाठी थेट २ एफएसआय दिला जाणार आहे. 
- म्हाडा इमारतींसाठी २.५ ते ३ वरून ४ एफएसआय दिला जाणार आहे. 
- सेस इमारतींसाठी पूर्वीचा ३ एफएसआय कायम ठेवण्यात आलाय. 
- संक्रमण शिबिरांसाठी २.५ वरून ४ एफएसआय, 
- नगर योजना बांधकामांसाठी 4 एफएसआय, 
- परवडणाऱ्या घरांसाठीही 4 एफएसआय दिला जाणार आहे. 

डीसीआर 2014-2034 

- मुंबईत 2 ते 5 Fsi राहणार 
- संपूर्ण मुंबईसाठी 2 एफएसआय राहणार, जो पूर्वी शहरासाठी 1.33 व उपनगर साठी 1 होता
- म्हाडा बिल्डींगसाठी 4 Fsi आहे, जो पूर्वी 2.5 ते 3 होता
- सेस बिल्डींगसाठी जुनाच Fsi राहिल,  कमीत कमी 3 अथवा पुनर्वसनास अधिक प्रोत्साहनपर क्षेत्रफळ
- कमर्शियलसाठी सरसकट 5 Fsi राहणार - सर्व तारांकीत हाँटेल साठी 5 Fsi, जो पूर्वी 3 ते 3.5 होता
- 33.11 कायमस्वरूपी संक्रमण शिबिरे 4 एफएसआय, पूर्वी 2.5
- 33.12 नगर योजन बांधकामे 4 Fsi, पूर्वी शहरासाठी 3.19 तर उपनगरात 2.5 
- माँल,बाजारपेठ व सामाजिक सुविधा साठी 5 Fsi, पूर्वी तरतूद नाही
- परवडणारी घरांसाठीही 4 Fsi 
- रोड सेट बँकसाठी 4 Fsi