बीएमसीने परवानगी नाकारल्याने कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांचीही पाठ

गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेला प्रोकँम पी १ हा कार्यक्रम बीएमसीने थांबवला आहे. परवानगी न घेताच हा कार्यक्रम घेतला जात होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 2, 2017, 06:40 PM IST
बीएमसीने परवानगी नाकारल्याने कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांचीही पाठ title=

मुंबई :  गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेला प्रोकँम पी १ हा कार्यक्रम बीएमसीने थांबवला आहे. परवानगी न घेताच हा कार्यक्रम घेतला जात होता. प्रोकँम इंटरनॅशनला मुंबई महापालिकेने अखेर दणका दिला आहे. 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते, पण या कार्यक्रमाला परवानगी नसल्याने, तसेच कार्यक्रमच थांबवल्यामुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

 मुंबई मँरेथॉनचे  हे आयोजक असून त्यांनी पावणेतीन कोटी रूपये थकवल्यानं परवानगी नाकारण्यात आली होती, तरी देखील प्रोकँमने हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला, पण बीएमसीने तो हाणून पाडला.