'मरे'चा ब्लॅक फ्रायडे, अपघातात दोघांचा मृत्यू...

मध्य रेल्वेचा घोळ संपता संपत नाहीय. दिवा स्टेशनच्या क्रॉसिंगला रेल्वे गाडीनं ट्रॅक क्रॉस करणाऱ्या बाईकस्वारांना उडवलंय. 

Updated: May 23, 2015, 11:04 AM IST
'मरे'चा ब्लॅक फ्रायडे, अपघातात दोघांचा मृत्यू... title=

मुंबई : मध्य रेल्वेचा घोळ संपता संपत नाहीय. दिवा स्टेशनच्या क्रॉसिंगला रेल्वे गाडीनं ट्रॅक क्रॉस करणाऱ्या बाईकस्वारांना उडवलंय. 

या घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा बाईकस्वार जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, शुक्रवारीही सकाळच्या वेळी ठाणे स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.  ठाणे स्टेशनजवळ ९ वाजून ५३ मिनिटांनी बिघाड झाला होता, त्यानंतर पावणे अकराच्या सुमारास बिघाड दूर करण्यात रेल्वेला यश आलं. सकाळचा गोंधळ झाल्यानंतर मध्य रेल्वे पूर्वपदावर यायच्या आत पुन्हा दिवा क्रॉसिंगवर हा प्रकार घडलाय.   

दरम्यान, मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्गावर सतत तांत्रिक बिघाड होत आहेत. त्यामिळे मध्यरेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत आहेत. या तांत्रिक बिघाडांची रेल्वेमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलीय. या बिघाडांची कारणं तपासण्यासाठी विशेष टीम पाठवण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. त्यासाठी रेल्वे बोर्डाने विशेष टीम पाठवावी असे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.