मुंबई : आपल्याच पक्षातील नेत्यांबाबात वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकणी आमदार राज पुरोहित यांना भाजप पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पुरोहित यांनी कथित चित्रफितीमध्ये पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे या नोटीसीत म्हणण्यात आले आहे. ही वक्तव्ये पक्षाच्या शिस्तीचा भंग करणारी आहेत. त्यामुळे पुरोहित यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
पुरोहित यांनी तीन दिवसांत भाजप प्रदेशाध्य अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे यासंबधीचे लेखी स्पष्टीकरण दयावे, असा आदेश भाजपकडून देण्यात आला आहे.
पुरोहित यांनी तीन दिवसांत या नोटीसीला उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारीच याप्रकरणात तथ्य आढळल्यास पुरोहितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.