भाजप आले बॅकफूटवर... काय झाले...

मुंबईत निवडणुकीसाठी आक्रमक झालेला भाजप जागावाटपच्या चर्चेनंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या, संभ्रम निर्माण केला आणि युती तोडली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 25, 2017, 07:28 PM IST
 भाजप आले बॅकफूटवर...  काय झाले...  title=

मुंबई : मुंबईत निवडणुकीसाठी आक्रमक झालेला भाजप जागावाटपच्या चर्चेनंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या, संभ्रम निर्माण केला आणि युती तोडली.

हा अनुभव लक्षात घेता मुंबई जागावाटप चर्चेसाठी सेनेने चर्चेसाठी डेडलाईन ठेवली.
भाजपने सुरुवातीला आक्रमक धोरण स्वीकारलं. सेनेवर अप्रत्यक्ष टीका सुरु ठेवली आणि 114 जागांची मागणी केली. 

शिवसेनेनं चर्चेत अडथळा ठरणारे पारदर्शक अजेंडा सारखे मुद्दे वरिष्ठ नेत्यांकडे नेत भाजपचा 114 जागांचा आकडा धुडकावला आणि फ़क्त 60 जागा देणार असल्याचे सांगितले. 

शिवसेनेची ताठर भूमिकेमुळे सुरुवातीला आक्रमक असलेली, जिल्हा परिषदमध्ये शिरकाव करण्याची संधी शोधणारी भाजप बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय.