पारदर्शक कारभारावर भाजप ठाम!

महापालिकेचा कारभार पारदर्शक असलाच पाहिजे. या मुद्द्यावर भाजप ठाम आहे

Updated: Feb 24, 2017, 10:52 PM IST
पारदर्शक कारभारावर भाजप ठाम! title=

मुंबई : महापालिकेचा कारभार पारदर्शक असलाच पाहिजे. या मुद्द्यावर भाजप ठाम आहे, असं वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे. तसंच काँग्रेससारख्या पक्षाशी आम्ही कोणतीही बोलणी करणार नाही, असंही आशिष शेलार म्हणालेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं पुढची रणनिती ठरवण्यासाठी बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे सगळे आमदार, खासदार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली.