मुंबई : मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जाणा-या मराठा समाजाची बाईक रॅली पार पडली.
सायनच्या सोमय्या ग्राऊंडवरुन सुरु झालेली ही बाईक रॅली गेट वे ऑफ इंडियापर्यंत नेण्यात आली. मुंबईतील मराठा मोर्चाची पूर्वतयारी आणि जनजागृतीसाठी ही बाईक रॅली काढण्यात आली.
या बाईक रॅलीत मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बाईकस्वार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या बाईक रॅलीचे नेतृत्व महिलांनी केलं.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, काँग्रेस नेते भाई जगताप हेसुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते.