मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगवासात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांना 'एसबीआय'नं जबर दणका दिलाय.
भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर भुजबळ यांना 'स्टेट बँक ऑफ इंडिया'नं थकबाकीदार म्हणून घोषित केलंय.
त्यांच्याकडून ६ कोटी ८ लाख ८४ हजार ६१७ रूपयांच्या वसुलीसाठी बँकेनं डिमांड नोटीस जारी केलीय. ही नोटीस जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत ही रक्कम थकबाकीदारांना भरावी लागणार आहे.
रक्कम न भरल्यास, भुजबळांच्या 'आर्मस्ट्राँग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचा जाहीर लिलाव करण्यात येईल, असं या नोटीशीत स्पष्ट करण्यात आलंय.