मुंबई : सकाळी सकाळी मुंबईकारांसाठी आनंदाची बातमी आहे. दर वर्षी बेस्टचा प्रवास महगाल्याच्या बातम्या एप्रिल मे महिन्यात येत असतात. यंदा मात्र गंगा उलटी वाहण्याची शक्यताय.
एक मे पासून बेस्टच्या किमान भाड्यात एक रुपयाची कपात होण्याची शक्यताय. बेस्टच्या प्रमुखांनी तसे संकेत दिले आहेत. गेल्या दशकभरात बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालीय.
प्रवाशांना पुन्हा एकदा बेस्टच्या गाड्यांकडे वळवण्यासाठी प्रवास भाड्यात कपात करावी अशी सूचना करण्यात आलीय. याविषयी सकारात्मक विचार करू असं बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे. सध्या बेस्टच्या दोन किलोमीटरच्या टप्प्यासाठी किमान भाडं 8 रुपये आहे.