'बेस्ट' भाडेवाढ १ एप्रिलपासून

१ एप्रिल रोजी एप्रिल फूल असेल असं मुंबईकरांना वाटत असेल, तरी देखिल १ एप्रिलपासून बेस्टची भाडेवाढ होणार आहे, मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारी ही दरवाढ अटळ आहे.

Updated: Mar 30, 2015, 11:40 PM IST
'बेस्ट' भाडेवाढ १ एप्रिलपासून title=

मुंबई : १ एप्रिल रोजी एप्रिल फूल असेल असं मुंबईकरांना वाटत असेल, तरी देखिल १ एप्रिलपासून बेस्टची भाडेवाढ होणार आहे, मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारी ही दरवाढ अटळ आहे.

अर्थसंकल्पातून १०० कोटींचा निधी बेस्टला जाहीर केल्यानंतरही बेस्ट भाडेवाढ अटळ आहे. त्यामुळे दोन महिन्यांनंतर पुन्हा म्हणजेच १ एप्रिलपासून मुंबईकरांवर तिकीट दरवाढीची टांगती तलवार आहे़ एक ते १० रुपये अशी ही दरवाढ असून, बेस्ट उपक्रमाचे किमान बसभाडे आठ रुपये होणार आहे़

दोन महिन्यांपूर्वी म्हणजे १ फेब्रुवारीपासून बेस्टचे किमान भाडे सात रुपये करण्यात आले होते़, तर वातानुकूलित बसगाड्यांचा किमान प्रवास २५ रुपये झाला आहे़.

 आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी दोन भाडेवाढ करण्याची परवानगी यापूर्वीच बेस्ट उपक्रमाने पालिकेकडून घेतली आहे़ पालिकेने सन २०१५-२०१६ चा अर्थसंकल्प मंजूर करताना त्यात वाढीव तरतुदींतून बेस्टला १०० कोटींचे आश्वासन दिले़

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.