बेस्टची 2 रूपयांनी भाडेवाढ

बेस्टच्या भाडेवाढिला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. बेस्टच्या भाड्यात 2 रूपयांची वाढ करण्यात आली असली तरी ही वाढ दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. 

Updated: Nov 20, 2014, 04:11 PM IST
बेस्टची 2 रूपयांनी भाडेवाढ title=

मुंबई : बेस्टच्या भाडेवाढिला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. बेस्टच्या भाड्यात 2 रूपयांची वाढ करण्यात आली असली तरी ही वाढ दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. 

पहिल्या टप्प्यात किमान भाड्यात  १ रूपयाची वाढ करण्यात आली आहे, ही वाढ १ फेब्रुवारी २०१५ पासून 1 रूपयाची दरवाढ लागू होणार आहे. ही भाडेवाढ लागू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यासाठी ७ रूपये मोजावे लागणार आहेत.
 
सर्वात महत्वाचं म्हणजे, एप्रिल महिन्यापासून दुसरी दरवाढ लागू होणार आहे. एप्रिल महिन्यापासून आणखी 1 रूपयाची दरवाढ लागू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत असताना दुसरीकडे बेस्टनं मात्र आपल्या भाड्यामध्ये वाढ केल्यानं प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.