बँक चार दिवस राहणार बंद

या आठवड्यात बँकांची कामं करण्याच्या तयारीत असाल तर ती पहिल्या तीन दिवसातच उरकून घ्या...कारण गुरूवारपासून चार दिवस देशभरातल्या बँका बंद राहणार आहेत. 

Updated: Oct 19, 2015, 12:50 PM IST
बँक चार दिवस राहणार बंद  title=

मुंबई : या आठवड्यात बँकांची कामं करण्याच्या तयारीत असाल तर ती पहिल्या तीन दिवसातच उरकून घ्या...कारण गुरूवारपासून चार दिवस देशभरातल्या बँका बंद राहणार आहेत. 

येत्या गुरूवारी दसऱ्या निमित्त देशभरातल्या बँकांना सुटी आहे. त्यानंतर शुक्रवारी मोहमर निमित्त बँका बंद राहतील. बँकांना दुस-या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी लागू झाली आहे. त्यानुसार यंदा चौथा शनिवार असल्यानं बँका बंद राहतील. त्यानंतर रविवारी आहे. सलग चार दिवस सुट्टया आल्यानं बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं, तरी ग्राहकांसाठी मात्र मनस्ताप वाढण्याची शक्यताय.. 

शिवाय देश भरातल्या बँका बंद असल्यानं रोखीचे आणि धनादेशानं होणारे कोट्यवधींचें व्यवहारही ठप्प होणार आहे. आतापर्यंत सलग चार दिवस सुटी आल्यास रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करत असे. पण यंदा तसा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.