www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांवेळी पालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांच्या मंजुरीचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती बैठकीत येणार आहे.
शिवाजी पार्कवर झालेल्या या अंत्यसंस्कारांवेळी मोठा पोलीस बंदोबस्त, मैदानावरील सीसीटीव्ही, एलईडी यासारख्या सुविधा पालिकेनं देऊ केल्या होत्या. फारसा वेळ हाती नसल्यानं निविदा न काढता हा खर्च मंजूर केला गेला होता.
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत येत असताना हा खर्च करदात्यांच्या माथी का मारला जातोय, असा सवाल पालिका वर्तुळात उपस्थित होतोय. शिवसेनेनं स्वतः या अंत्यसंस्कारांवर लाखो रुपये खर्च केले. असं असताना ५ लाख रुपयांसाठी करदात्यांच्या खिशात हात घालण्यास काही जणांचा आक्षेप आहे.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.