मुंबई: आयसिसचा प्रमुख अबु बकर अल बगदादी मुंबईतल्या तरुणांना आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग देतोय. सुसाईड बॉम्ब कसे बनवायचे याचं ट्रेनिंग बगदादी या मुलांना ऑनलाईन देत आहे. अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
एटीएसनं आयसिसशी संबंधित असलेल्या काही आरोपींची चौकशी केली. तेव्हा हा प्रकार समोर आला आहे.
बगदादीनं स्काईप आणि व्हिडिओ कॉलिंगची मदत घेऊन मुंबई आणि भारतातल्या वेगवेगळ्या भागातल्या तरुणांशी संवाद साधला आणि हे ट्रेनिंग दिलं. महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनिंगमध्ये मुलींचाही समावेश होता. असं तपासात पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.