दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारला आयुक्त पदाचा पदभार

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी रविवारी अधिकृतरिकत्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  यावेळी दहशतवादाला आळा घालण्यासाठी तसेच महिला आणि नागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. 

Updated: Jan 31, 2016, 01:08 PM IST
 दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारला आयुक्त पदाचा पदभार title=

मुंबई : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी रविवारी अधिकृतरिकत्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  यावेळी दहशतवादाला आळा घालण्यासाठी तसेच महिला आणि नागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. 

मूळचे पुण्याचे असलेले पडसलगीकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातील शिवाजी मिलेट्री स्कूल मध्ये झाले असून महाविद्यालयीन शिक्षण ही पुण्यातच झालं आहे. आयुक्त पदावर येण्यापूर्वी ते आयबीमध्ये कार्यरत होते. 

आयपीएस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांनी तब्बल १७ वर्षे म्हणजेच १९९७ पासून गुप्तचर विभागात विविध पदांवर काम केले आहे.