मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीचा लिलाव आज मुंबईत पार पडला. ज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार बालकृष्णन यांनी बाजी मारली आहे. दाऊदच्या दिल्ली जायका या हॉटेलसाठी त्यांना ४ कोटी २८ लाखांची बोली लावली.
काही दिवसांपूर्वी बालकृष्णन यांनी दाऊदच्या या संपत्तीच्या लिलावात सहभागी न होण्यासाठी धमकी देण्यात आल्याचा आरोप केला होता. छोटा शकील याच्याकडून धमकी आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
मुंबईतील डिप्लोमॅट हॉटेलमध्ये जाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला. ज्यामध्ये दिल्ली जायका या हॉटेलची पहिली बोली १ कोटी १८ लाख एवढी लावण्यात आली.
बुरहड यांनी या हॉटेलसाठी 1 कोटी २७ लाखांची बोली लावली होती. त्यानंतर बालकृष्णन यांनी १ कोटी २८ लाखांची बोली लावून हे हॉटेल आपल्या पदरात पाडून घेतलं.
दिल्ली जायका हॉटेलच्या जागी बालकृष्णन हे गरिबांसाठी एक एज्युकेशन सेंटर बनवणार असल्याची इच्छा त्यांनी बोलवून दाखवली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.