मुंबईतल्या मॉलमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा धोका?

मुंबईतल्या मॉलमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकत असल्याचा इशारा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा यंत्रणांनी दिलाय. केनियाची राजधानी नैरोबीतल्या मॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला मुंबईतही होण्याची भीती आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं म्हणजेच सीआयएसएफनं शहरातल्या सर्व मॉल्सना अतिदक्षतेचा इशारा दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 29, 2013, 12:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या मॉलमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकत असल्याचा इशारा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा यंत्रणांनी दिलाय. केनियाची राजधानी नैरोबीतल्या मॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला मुंबईतही होण्याची भीती आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं म्हणजेच सीआयएसएफनं शहरातल्या सर्व मॉल्सना अतिदक्षतेचा इशारा दिलाय.
नैरोबीत 12 सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७२ जण ठार झाले होते. या पाश्र्वभूमीवर शहरातल्या सर्व मॉल्सच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून त्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. मॉल्सची सुरक्षाव्यवस्था अधिकाधिक कठोर करण्याचे आदेशही मॉल्सच्या प्रशासनांना देण्यात आलेत.
मॉल्सच्या सुरक्षेचा रोजच्या रोज अहवाल सादर करण्याचंही मॉल प्रशासनाला सांगण्यात आलंय. जर मॉलमध्ये प्रसारित सुरक्षा नसल्याचं आढळल्यास त्या मॉलवर कारवाई करण्यात येईल असं एका पोलीस अधिका-यानं सांगितलंय. शिवाय मॉलमध्ये मॉकड्रील देखील वाढवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.