सायबर कॅफेत अश्लील चाळे, 22 मुलामुली ताब्यात

सध्या इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे, त्यामुळे आपल्याला गल्लीबोळात इंटरनेट कॅफे ओपन झाली आहे. पण इंटरनेट कॅफेच्या आडून अश्लिल चाळे करण्याचा धंदा उघडकीस आला आहे. 

Updated: Apr 8, 2015, 06:23 PM IST
सायबर कॅफेत अश्लील चाळे, 22 मुलामुली ताब्यात title=

उल्हासनगर : सध्या इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे, त्यामुळे आपल्याला गल्लीबोळात इंटरनेट कॅफे ओपन झाली आहे. पण इंटरनेट कॅफेच्या आडून अश्लिल चाळे करण्याचा धंदा उघडकीस आला आहे. 

उल्हासनगरमधल्या सायबर कॅफेमध्ये अलील चाळे करणाऱ्या 22 मुलामुलींसह 6 मॅनेजर आणि मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
उल्हासनगरमधल्या एल एम डी सायबर कॅफेमध्ये प्रशस्त खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या खोल्या कॉलेजमधील युवक-युवतींना भाड्यानं देऊन अश्लील धंदा करणाऱ्या मालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
 
तसंच 22 जोडप्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. येथील सायबर कॅफेमध्ये जवळच असणाऱ्या महाविद्यालयातील अनेक तरुण-तरुणी देखील जात असल्याचे समोर आलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.