मुंबई : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. कलाम यांची ही जयंती संपूर्ण महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतोय.
या दिनाच्या निमित्ताने वाचन, संवाद, आत्मचरित्र, कथा यातून पुस्तकांशी नाळ जोडण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये एक कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यानंतर तिथं डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा स्थापन होणार आहे.
तर काही शाळांना पुस्तक पेटी भेट देण्यात येणार आहे.. तसंच एकमेकांना पुस्तक भेट देऊन डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचं आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.