डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलचा आणखी एक बळी

डोंबिवली कोपर दरम्यान अजून एकाचा लोकल मधून पडून मृत्यू झालाय...नितीन चव्हाण या 45 वर्षीय इसमाचं नावं आहे..

Updated: Dec 2, 2015, 10:48 AM IST
डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलचा आणखी एक बळी  title=

मुंबई : डोंबिवली कोपर दरम्यान अजून एकाचा लोकल मधून पडून मृत्यू झालाय...नितीन चव्हाण या 45 वर्षीय इसमाचं नावं आहे.

अधिक वाचा : मुंबईत पुन्हा आणखी एक लोकल गर्दीचा बळी

काल रात्री 9.15च्या सुमारास ही घटना घडली. ज्या ठिकाणी भावेश नकाते पडला त्याच ठिकाणी चव्हाण यांचाही मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतेय.

अधिक वाचा : मुंबई लोकलचे दरवाजे बंद करणार, शिवसेनेचा विरोध 

दरम्यान काल गर्दीमुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवलाय. लोकलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला.

गर्दीमुळे दरवाजात लटक प्रवास करीत असताना ३२ वर्षी नरेश महादू पाटील याचा पडून मृत्यू झाला. तो कळवा ते ठाणे दरम्यान प्रवास करीत होता. त्याचा हात सुटल्याने तो पडला. यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आश्वान रेल्वे प्रशासनावर आहे.

अधिक वाचा : VIDEO : धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला 

तीन हजारांवर गेले बळी

रेल्वे अपघातांच्या घटना दररोज घडतच असून त्यात आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. मृतांमध्ये २६५५ पुरुष तर ३४१ महिलांचा समावेश आहे. याशिवाय अपघातांमध्ये २९२६ जण जखमी झाल्याची नोंद आहे.

रेल्वे रूळ ओलांडू नका, टपावर बसून प्रवास करू नका, स्टंटबाजी तसेच दरवाजावर लटकू नका अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केल्या जातात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दररोज रेल्वे अपघाताच्या घटना घडतच आहेत. नोव्हेंबरपर्यंत अपघातांमध्ये तीन हजारजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दररोज सरासरी दहाजणांचा बळी जात आहे. तसेच अनेकजण आत्महत्यादेखील करीत आहेत.

अपघातात आघाडीवर…

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ४३७ जण ठार झाले तर कुर्ल्याच्या हद्दीत ३९० आणि ठाण्यात ३६५ जण दगावले. चौथ्या स्थानावर बोरिवली (३०२) तर पाचव्या स्थानावर वसई २७१ आहे.

 

ऑक्टोबरपर्यंत अपघातांचे कारण आणि बळी

रेल्वे रूळ ओलांडताना – १५२८

धावत्या ट्रेनमधून पडलेले – ६३५

खांबाला धडकल्याने – ३०

इलेक्ट्रिक शॉक लागून – १४

आत्महत्या – ३१

नैसर्गिक मृत्यू – ४१०

अन्य – ९२

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.