मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये घोषणायुद्ध

मुंबई महानगरपालिका सभागृहात महापौरांच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी तत्पूर्वी घोषणायुद्ध पाहायला मिळालं. भाजपच्या नगरसेवकांनी मोदींच्या नावानं जोरदार घोषणाबाजी केली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

Updated: Mar 8, 2017, 02:20 PM IST
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये घोषणायुद्ध title=

मुंबई : मुंबई महानगरपालिका सभागृहात महापौरांच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी तत्पूर्वी घोषणायुद्ध पाहायला मिळालं. भाजपच्या नगरसेवकांनी मोदींच्या नावानं जोरदार घोषणाबाजी केली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडैश्वर भरघोस मतांनी निवडून आले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराचा भाजपच्या 82 नगरसेवकांसह त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षानंही पाठिंबा दिला. त्यामुळं शिवसेनेचे बहुमत थेट 171 पर्यंत पोहचलं.आता तर आधी भाजपसोबत असलेल्या अपक्ष नगसेविका मुमताज खान यांनी मात्र सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यांसाठी मतदानाच्यावेळी हात केला नाही.

मनसेचे सातही नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिले आहेत. महापौरपदाच्या निवडीसाठी शिवसेनेचे अनेक शिलेदार मुंबई महापालिकेत हजर होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंचा, ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक हे महापालिकेत आवर्जुन हजर होते.