पंतप्रधानांशी चर्चा न करताच ‘सेनेचे दूत’ माघारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे दूत अनंत गिते पंतप्रधानांशी चर्चा न करताच माघारी परतलेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते यांना फोन करून माघारी बोलावून घेतलंय. 

Updated: Nov 8, 2014, 08:51 PM IST
पंतप्रधानांशी चर्चा न करताच ‘सेनेचे दूत’ माघारी title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे दूत अनंत गिते पंतप्रधानांशी चर्चा न करताच माघारी परतलेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते यांना फोन करून माघारी बोलावून घेतलंय. 

यामुळे, शिवसेना भाजप मधली दरी आणखीनच वाढल्याचं दिसतंय. त्यामुळे, शिवसेना सत्तेत सहभागी होणार किंवा नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी राज्याबाबत निर्णय व्हावा, अशी भाजपबाबत कठोर भूमिका शिवसेनेनं घेतलीय. महाराष्ट्रात सरकारमध्ये सन्मानजक स्थान दिलं तरच शिवसेना केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमाला उपस्थित राहील, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. भाजपबरोबर सेनाही अधिक आक्रमक झाली आहे.

शिवसेनेला हवंय उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्रीपद... 
राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपपुढे एक प्रस्ताव ठेवलाय. या प्रस्तावानुसार, शिवसेनेनं राज्यात उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद या दोन प्रमुख पदांची मागणी केलीय. तसंच, शिवसेनेला एकूण १० मंत्रिपदं मिळावीत, असं देखील शिवसेनेनं म्हटलंय. अशी माहिती शिवसेना नेता संजय राऊत यांनी माहिती दिलीय. 

दरम्यान, सरकार अस्थिर होईल अशी कुठलीही भूमिका घेणार नाही असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. यामुळे, शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा त्यांचा मानस असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.