अमित देशमुख, अब्दुल सत्तार बिनखात्याचे मंत्री

राज्याच्या मंत्रीमंडळात जरी विस्तार करण्यात आला तरी अमित देशमुख, अब्दुल सत्तार अद्याप बिनखात्याचे मंत्री आहेत. तर विधान परिषदेच्या नावांबाबतही संभ्रम कायम आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 6, 2014, 07:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्याच्या मंत्रीमंडळात जरी विस्तार करण्यात आला तरी अमित देशमुख, अब्दुल सत्तार अद्याप बिनखात्याचे मंत्री आहेत. तर विधान परिषदेच्या नावांबाबतही संभ्रम कायम आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी वाढत चाललीय. शपथविधी होऊन 5 दिवस उलटले तरी कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार आणि राज्यमंत्री अमित देशमुख यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. बिनखात्याचे मंत्री म्हणूनच ते अधिवेशनात हजेरी लावतायत.
तसेच विधान परिषदेच्या सहा उमेदवारांची नावं देखील अजून मुख्यमंत्र्यांना निश्चित करता आलेली नाहीत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील असंतोष वाढत चाललाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.