मुंबई : सुपरस्टार आमिर खान जलयुक्त शिवारसाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणार करणार आहे. राज्यात तीन तालुक्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवणार येणार असून पाणीप्रश्नावर एकत्र येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेय.
दरम्यान, राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी राज्य सरकारनं सुपरस्टार आमिर खानला ब्रँड अँबेसिडर नेमलाय. त्यामुळं आमीर खान आता पाणी अडवा पाणी जिरवाचा राज्यभर प्रचार करणार आहे.
राज्यातल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी सुपरस्टार आमिर खानला पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करणार आहे. राज्यातल्या तीन तालुक्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवणार असल्याचंही आमीरनं सांगितलं.
यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून उद्योगपती मुकेश अंबानींपर्यंत सर्वांशीच चर्चा केली असून ही मोहीम जनचळवळ बनावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमिरनं नमूद केलं.
आमिरनं जलयुक्त शिवारसाठी ब्रँड अँबेसिडर न होता थेट जमिनीवर काम करण्याची इच्छा व्य़क्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि सत्यजीत भटकळ उपस्थित होते.