आनंदाची बातमी: आता लोकलचे मासिक पासही पेपरलेस होणार

 मोबाईलवरून रेल्वेचं तिकीट काढण्याचं अॅप लॉन्च झाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे मासिक पासही आता मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रैमासिक पासधारकांना दिलास मिळणार आहे. 

Updated: Jul 9, 2015, 05:13 PM IST
आनंदाची बातमी: आता लोकलचे मासिक पासही पेपरलेस होणार title=

मुंबई: मोबाईलवरून रेल्वेचं तिकीट काढण्याचं अॅप लॉन्च झाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे मासिक पासही आता मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रैमासिक पासधारकांना दिलास मिळणार आहे. 

त्यामुळं रेल्वे पासासाठी रांगेत उभं राहण्याची तसंच पासची छापील प्रत बाळगण्याची काहीही गरज राहणार नाही. प्रवाशांच्या मोबाईलमध्येच पास राहणार आहे.

पश्‍चिम रेल्वेवरील अनारक्षित लोकल तिकीटं पेपरलेस झाल्यानंतर पुढचा प्रयोग मासिक पासही मोबाईलद्वारे काढण्यासाठी होणार आहे अशी माहिती 'क्रीस' या संस्थेचे मुंबई महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी स्पष्ट केलं. मात्र पहिल्यांदाच पास काढणार्‍यांना तिकीट खिडकीवरच पास काढावा लागणार असून त्यापुढील पासाचे नूतनीकरण या मोबाईल अॅपद्वारे करता येणार आहे. 

मोबाईलवरून पास काढण्यासाठी प्रवाशांना कोणत्या गोष्टींची माहिती अॅपमध्ये भरावी लागेल याची सध्या चाचपणी सुरू असून त्यात रेल्वेच्या ओळखपत्र क्रमांकाबरोबरच प्रवाशांच्या मोबाईल क्रमांकाचाही समावेश असणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.