अडीच हजार रुपयांत राज्यांतर्गत विमान प्रवास

राज्यांतर्गत विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे विमान वाहतूक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Updated: Aug 22, 2016, 11:05 PM IST
अडीच हजार रुपयांत राज्यांतर्गत विमान प्रवास title=

मुंबई : राज्यांतर्गत विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे विमान वाहतूक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

या धोरणाची राज्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली तर राज्यातील कुठल्याही जिल्ह्यातून मुंबई अथवा मुख्य शहरात तुम्ही अडीच हजार रुपयात विमानप्रवास करू शकता. 

राज्यातील काही जिल्हे सोडले तर सर्वच जिल्ह्यात विमानतळांची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार विमान कंपन्यांना अनुदान देणार आहे. 

विमान वाहतुकीचा खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याच्यात जी तफावत असेल त्याची रक्कम विमान कंपन्यांना दिली जाणार आहे. यातील 80 टक्के रक्कम केंद्र सरकार आणि 20 टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. तसंच विमान कंपन्यांना टर्मिनल तसेच लॅण्डीग आणि पार्किंग चार्ज आकारला जाणार नाही. 

तसेच व्हॅटमध्येही सवलत दिली जाणार आहे. यामुळे भविष्यात राज्यातील सर्व जिल्हे छोट्या विमानसेवेने जोडले जाणार असून राज्यातील पर्यटन वाढण्यासही यामुळे मदत होणार आहे.